Belagavi

बेळगावमध्ये ड्रेनेज कामादरम्यान कामगारांचा मृत्यू

Share

बेळगावच्या न्यू गांधी नगर परिसरात बुधवारी अंतर्गत ड्रेनेज पाईपलाईन कामादरम्यान माती कोसळून गोकाक येथील दोन कामगारांचा मृत्यू झाला.

बुधवारी सकाळी न्यू गांधी नगर परिसरातील राष्ट्रीय महामार्गाजवळ पाईपलाइन प्रकल्पावर काम करणाऱ्या गोकाक येथील दोन कामगारांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी यावेळी केली.

दरम्यान गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे.

Tags: