प्राणिमात्रांवर अनेकजण जीव लावतात. आपल्या लाडक्या जनावरावर पोटच्या पोरावर जीव लावणाऱ्यांची संख्यासुद्धा या जगात कमी नाही. अशाच एका आपल्या लाडक्या गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा केलाय मुचंडी या गावातील शिरोले कुटुंबीयांनी…
शर्यतीचे बैल आणि गायीच्या संगोपनात अग्रेसर असलेले मुचंडी येथील शिरोले कुटुंबीय. या कुटुंबीयांनी आपल्या ‘कल्याणी’ या खिल्लार गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शिरोले कुटुंबियांसह शेजारच्या नागरिकांनीही या कार्यक्रमात जल्लोषाने सहभाग घेतला.
या सोहळ्यात शिरोळे कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने गायीला साडी-चोळी नेसवली, औक्षण केले, ओटी भरली. या वेळी गायीला फळं, गोडधोड पदार्थ, तसेच विविध गोधान्य अर्पण करण्यात आलं. शेजारी, ग्रामस्थ आणि शिरोले कुटुंबीयांनी मिळून जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केला. या आगळ्या उपक्रमातून जनावरांविषयी असलेलं प्रेम आणि गोवंश संवर्धनाची भावना अधोरेखित झाली. संपूर्ण गावात या अनोख्या सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.


Recent Comments