सरते वर्ष 2024 संपले. काल रात्रीपासून 2025 वर्षाची सुरुवात झाली असून बेळगावकरांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. रात्री 12 वाजता रंगीबेरंगी फटाक्यांनी आकाश उजळून निघाले. बेळगावातील नागरिकांनी ओल्डमॅनचे दहन करून ‘ 2025 चे स्वागत करून , नववर्ष साजरे केले.


बेळगावच्या गल्लीबोळात तरुण-तरुणींनी बनवलेले ओल्डमॅन जाळून सरत्या २०२४ वर्षाला निरोप देण्यात आला . डीजे तालावर तरुणाई थिरकत होती . अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील हॉटेल्समध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावचा कॅम्प परिसर हे आकर्षणाचे केंद्र होते, मध्यरात्री 12 वाजता ओल्डमॅन दहनासाठी लोक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

जुन्या वर्षाच्या सर्व कटू आठवणी ओल्डमॅनसोबत जाळून टाकल्या आणि नवीन वर्षाची सुरुवात नव्या जोमाने झाली. २०२५ हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी आनंदाचे आणि आनंदाचे जावो.


Recent Comments