बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात स्वच्छता व नूतनीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेतली. उद्यानात दररोज येणाऱ्या नागरिकांसाठी व मुलांसाठी या परिसराचे नूतनीकरण करण्यात येत असून, या मोहिमेत अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी शहापूर येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात स्वच्छता व नूतनीकरण अभियान सुरू केले. या उद्यानाला दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, लहान मुले, आणि ज्येष्ठ नागरिक भेट देतात.


उद्यानातील व्यायामासाठीच्या साधनांची स्वच्छता, देखभाल आणि रंगकाम तसेच मुलांसाठी असलेल्या खेळणी सुविधांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामासाठी आमदार पाटील यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनीही मोलाचे योगदान दिले.
अभियानादरम्यान, आमदार पाटील यांनी उद्यानाच्या स्वच्छतेबाबत आणि तेथील सुविधा सुधारण्याबाबत नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी असे आश्वासन दिले की, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे शहरातील एक उत्तम उद्यान म्हणून विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
उद्यानाच्या नूतनीकरणामुळे नागरिक आणि लहान मुलांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments