Vijayapura

विजयपुरातील साखळी अपघातातील जखमींपैकी दोघांचा मृत्यू

Share

विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरातील रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी झालेल्या अपघातात तेरा जण जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

विजयपुर रुग्णालयात दाखल केलेल्या आकाश चव्हाण आणि रवी चव्हाण यांचा मृत्यू झाला. आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे विजयपूरचे पोलीस अधीक्षक हृषिकेश सोनवणे यांनी सांगितले.

सुरेखा चव्हाण, शिरू पवार, शंकर पवार, इंदू पवार, माधवी पवार, माया पवार, मधु पवार, लक्ष्मी पवार, सविता चव्हाण, मल्ली शंकर पवार, सत्याबाई शंकर पवार, राजवीर शंकर पवार हे या अपघातात जखमी झाले. हे सर्व इंडी येथील रहिवासी आहेत. एसपी ऋषिकेश सोनवणे, डीवायएसपी जगदीश एएस, सीपीआय रतनकुमार जिरगिहाल, मल्लिकार्जुन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Tags: