भ्रष्टाचाराबाबत अनेक कल्पना बाहेर येत आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. सर्व पक्षांतून भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराविरोधात संघर्षाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया धारवाडमधील लोकायुक्त सेवानिवृत्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी व्यक्त केली.

धारवाडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, भ्रष्टाचार हा चिंताजनक विषय आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला तर आपल्या आर्थिक परिस्थितीचे काय होईल? भ्रष्टाचारामुळे मध्यमवर्गीय आणि दारिद्र्यरेषेखालचे जनतेला फटका बसेल. श्रीमंत लोकांकडे नेहमीच पैसा असतो. मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला तर लोकशाही टिकणार नाही असे मला वाटते. विकासकामे होत आहेत, पण जनहिताची नाही.

लोकप्रतिनिधी स्वत:च्या विकासावर जास्त भर देत आहेत, पूर्वीच्या सरकारला तत्कालीन विरोधी काँग्रेस पक्षाने भाजपला ४० टक्के कमिशनचे सरकार म्हटले होते. आज काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आहे. या सरकारने वाल्मिकी महामंडळाचा भ्रष्टाचार केला. त्यामुळे भ्रष्टाचार फक्त एका पक्षापुरता मर्यादित नाही. असे ते म्हणाले.
ज्यांना आदर्श मानायचे ते लोक आज तुरुंगात आहेत. राजकारणी धनाढ्यांच्या हातात अधिक पैसे वाढवत आहेत. धनाढ्य आणि राजकारण्यांचा लोभ कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. समाजात मोठा बदल होत आहे. मात्र तो बदल पुढच्या पिढीसाठी शांतता आणि सौहार्दपूर्ण असायला हवा. नव्या पिढीने समरसतेच्या मार्गावर चालले पाहिजे. राजकारणात वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे तर सेवेसाठी येणे गरजेचे आहे. राजकारण हे व्यक्तिगत पातळीची नव्हे तर देशाच्या हितासाठी केले पाहिजे. मात्र हल्ली राजकारणात येणारे केवळ स्वत:च्या फायद्यासाठी येत असून मोठमोठ्या थापाच ते मारत असल्याचे सांगत त्यांनी राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली.


Recent Comments