लोकसभा निवडणुकीत अथणीत काँग्रेस पक्षाला अल्पशी आघाडी मिळाल्याने सवदींच्या विरोधात मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संताप व्यक्त केला होता . दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरूच होते. मात्र आता दोघेही वाद विसरून एक झाले असल्याची जोरदार चर्चा आहे.
सोमवारी पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी जुगुळ गावात आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या चिक्कोडीला परतत असताना लक्ष्मण सवदी आणि मंत्री सतीश जारकीहोळी त्यांच्या गाडीतून एकत्रच निघाले .
मंत्री सतीश यांनी त्यांची मुलगी प्रियंका यांना चिक्कोडी लोकसभेतून उमेदवारी दिली. यावेळी सतीश जारकीहोळी यांनी अथणीचे आमदार सवदी आणि कुडचीचे आमदार महेंद्र तमन्नावर यांनी काँग्रेस उमेदवारावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीच या दोन्ही नेत्यांमधील भांडण मिटवण्यात पुढाकार घेतल्याचे ऐकायला मिळत आहे. दोन दिग्गज नेत्यांमधील भांडणामुळे पक्षाचे नुकसान होईल, यावरूनच ही चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
Recent Comments