बेळगाव तालुक्यातील बसापुरा गावातील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गाव ते बसापुरा गावापर्यंतचा जोड रस्ता खराब झाला असून वर्षानुवर्षे या रस्त्याची डागडुजी करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता गेल्या दहा वर्षांपूर्वी विकसित करण्यात आला होता. येथील भाग काळ्या मातीचा परिसर असल्याने याठिकाणी पक्का रस्ता करण्यात आला नाही. रस्त्यावरील डांबर देखील उखडला असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून जा ये करणे अवघड बनले आहे.


शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत असून मुसळधार पावसामुळे आणखीनच यामध्ये भर पडली आहे. रस्त्याची डागडुजी करून तातडीने हि समस्या सोडवावी अशी मागणी समीर दोडमणी, रवी हिरेमठ, बसवराज हनुमण्णावर, यासीन भगवान, रसूल भगवान आणि येथील ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments