आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एकत्र आहोत. कालच्या बाईक रॅलीने हे दाखवून दिले आहे. जगदीश शेट्टर यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण मेहनत घेत असल्याचे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

बेळगावात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एकसंघ आहोत. सर्व मतभेद मिटले असून कालच्या बाईक रॅलीने हे दाखवून दिले आहे. मतभेद बाजूला सारून सर्वजण भाजपच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत मी आरामात घरी बसणार आहे, असे अभय पाटील यांचे वक्तव्य व्हायरल झाले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, मी बागेवाडीचा आमदार असताना पक्षाचे संघटन खूप केले, आता जरा कमी फिरतोय, असे माझे वक्तव्य होते. ते कट करून व्हीडीओ व्हायरल करण्यात आलाय. ते कट अँड पेस्ट आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आली म्हणून बेळगाव, उत्तर, ग्रामीण भागात काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांची आई भगवा झेंडा घेऊन धावली, सिद्धरामय्या यांनी त्यांना घातलेला भगवा फेटा काढला होता, त्याचा निषेध ते करणार का, असा सवाल अभय पाटील यांनी केला.
भाजपमध्ये आम्ही प्रत्येकजण, प्रत्येक कार्यकर्ता भाजपचा उमेदवार आहे, आम्हीही कुटुंबातील मुले आहोत, भाजपमध्ये प्रत्येकजण उमेदवार आहे, स्वाभिमानाची चर्चा करायला दिवसभर जातो, सोनिया गांधी येथून जिंकल्या तेव्हा कुठे गेला स्वाभिमान? अजय माकन कर्नाटकातून राज्यसभेवर गेले तेव्हा कुठे गेला स्वाभिमान?, येथे एकच आहे, काँग्रेसला मत दिल्यास राहुल गांधींना जाईल, भाजपला मत दिल्यास मोदींना जाईल. जनताच याबाबत काय तो निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले.
तेलंगणा प्रभारींबाबत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, मी आठवड्यातून तीन दिवस बेळगावात आणि दोन दिवस तेलंगणात प्रचार करणार आहे. तेलंगणातील 17 पैकी 10 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली आहे. तेथे जाऊन पक्ष नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या सहकार्याने प्रचार करणार आहे.


Recent Comments