काही किरकोळ घटना वगळता राज्यात नवीन वर्षाचा स्वागत समारंभ शांततेत पार पडल्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले.

बेंगळुरमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, रविवारी रात्री नवीन वर्षाचा उत्सव शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने आमच्या पोलिसांनी काम केले. नववर्षाच्या उत्सवात संपूर्ण राज्यातील जनतेने सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. काही किरकोळ घटना वगळता नवीन वर्षाची सुरुवात शांततेत झाल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना सीबीआयने पाठवलेल्या नोटिशीबाबत बोलताना, सीबीआय त्यांच्यापरीने काम करत आहे. आम्ही आमचे काम करू. डीकेशींना नोटीस का देण्यात आली याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, हायकमांडने त्या दोघांना दिल्लीत बोलावले आहे. त्यानुसार ते दिल्लीला जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आम्ही आमचे मत त्यांना सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला बोलावण्याची गरज नाही, असे परमेश्वर यांनी सांगितले.
यावेळी प्रताप सिंह यांच्या भावाला झालेल्या अटकेबाबत प्रतिक्रिया देताना परमेश्वर म्हणाले की, यात कोणतेही राजकारण नाही. झाड तोडले आहे, म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही अटक करण्यात आली असे म्हणणे योग्य नाही. प्रतापसिंहांचे भाऊ असोत वा अन्य कोणी, दोषी असलेल्या कोणावरही कारवाई केली जाईल. येथील कायद्याला किंमत द्यावीच लागते. येथे दडपणाचा काय सवाल आहे? असा प्रश्न त्यांनी केला
राममंदिराच्या उद्घाटनाला जाण्याबद्दल बोलताना, आम्हीही हिंदू आहोत. केवळ भाजपवालेच हिंदूं नाहीत, अयोध्येत जायचे की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल. भाजपलाच नाही तर सर्वांनाच रामराज्य हवे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, राममंदिराच्या उद्घाटनाला जायचे की नाही हे इंडिया आघाडीचे दिल्लीचे नेते ठरवतील, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments