Belagavi

आठवडाभरापासून अधिवेशन सुरु : अद्यापही उत्तर कर्नाटकाच्या प्रश्नांवर नाही चर्चा

Share

गेल्या आठवडाभरापासून अधिवेशन सुरु असून अद्यापही उत्तर कर्नाटकाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही . या भागाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या मालिनी सिटीजवळ , भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती आ . निखिल कत्ती यांनी दिली .
आज सुवर्णसौध येथे बोलताना ते म्हणाले की, गेल्या आठवडाभरापासून बेळगाव शहरात अधिवेशन सुरू असून अद्यापही उत्तर कर्नाटकच्या प्रश्नांवर कोणतीही चर्चा झाली नसून येत्या तीन दिवसात या भागावर चर्चा होऊ द्यावी.

ते म्हणाले की, आमचे वडील उमेश कत्ती यांचे हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयात उद्यान बांधण्याचे स्वप्न होते, त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची भेट घेऊन काम सुरू करण्यास सांगितले आणि महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी नवीन न्यायालयाच्या बांधकामाची व्यवस्था केली आहे.

तसेच या भागाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या मालिनी सिटीजवळ भव्य आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.

Tags: