रयत मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे म्हणाले की, राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजप रयत मोर्चातर्फे 12 सप्टेंबर रोजी चिक्कोडी व निप्पाणी भागात भव्य आंदोलन करण्यात आले.

चिक्कोडीच्या खासदार कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ आदींच्या उपस्थितीत चिक्कोडी शहरातील गांधी कट्ट्यापासून , मिनीविधानसौधापर्यंत १२ सप्टेंबर रोजी भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे.

पुरेशी वीज न देता लोडशेडिंग करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्याच्या सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे . एपीएमसी कायदा रद्द करणे, कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडणे, दुष्काळ जाहीर न करणे अशा अनेक शेतकरी विरोधी धोरणांचा भाजप निषेध करेल.
यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष संजय पाटील, पवनकुमार महाजन आदी उपस्थित होते.


Recent Comments