भाजप-जेडीएस मैत्रीचे स्वागतच करतो, त्याला आम्ही घाबरत नाही, आम्ही लोकांकडे मते मागतो. जनता आमच्या पाठीशी आहे असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जेडीएसची युती झाल्याबद्दल मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. जनता आमच्या पाठीशी आहे. जनतेच्या आकांक्षा काय आहेत हे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही त्या चांगल्या प्रकारे पूर्ण करत आहोत.

त्यांनी युती केली तर आम्ही त्यांचे स्वागत करू, पण त्यांचा मुखवटा उतरला आहे, काँग्रेसमध्ये कोण येते आणि त्यांना कोण घाबरते हे मला माहीत नाही, जगदीश शेट्टर बेळगाव लोकसभा मतदार संघातून उभे राहतील का, असे विचारले असता, आपण जर-तरच्या गोष्टींना उत्तर देत नाही. बेळगावात अनेक पात्र नेते आहेत, त्यांच्याशी हायकमांड चर्चा करून निर्णय घेणार आहे असे त्यांनी सांगितले.
एकंदर, भाजप-जेडीएस युतीचे स्वागत करतो, काँग्रेसला त्याची चिंता नाही, जनता आमच्या पाठीशी आहे असा दावा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला आहे. ते खरे की खोटे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होणार आहे.


Recent Comments