दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगावातील शिवबसवनगरात बुधवारी उशिरा घडली आहे. दुचाकीवरून आलेय तिघांनी रस्त्याच्या मधोमध तरुणाला गाठून दगडाने ठेचून त्याची हत्या केली आहे.
रामनगर येथील रहिवासी 26 वर्षीय नागराज गाडीवड्डर याचा बुधवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तिघांनी खून केला. नागराज मोबाईलवर बोलत रस्त्याने जात होता. त्यावेळी त्याच्याआधीच तिघेजण काही अंतर पुढे येऊन थांबले होते. त्यापैकी एकाने नागराज काही अंतर पुढे गेल्यावर दुचाकीवरून उतरून हातातील दगडाने रस्त्याच्या मधोमध ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. बेळगावातील शिवबसवनगर येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. या खुनाचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. त्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या आधार तपास सुरू केला आहे. हत्येनंतर तिन्ही गुंड वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. घटनास्थळी श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी भेट देऊन माहिती गोळा केली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी शेखर, एसीपी कट्टीमणी यांनी भेट देऊन पाहणी केली. नागराजचा मृतदेह पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बिम्स रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी बेळगाव माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belagavi
बेळगावात शिवबसवनगरात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या


Recent Comments