चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर शहराच्या हद्दीत बेल्लद बागेवाडी रस्त्यालगत असलेल्या चिक्कोडी उप कालव्याच्या बाजूला एकाचा खून करून मृतदेह टाकण्यात आला होता. या प्रकरणी चिक्कोडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी केडी गावातील भीमन्ना मुन्नोळी, वय ५१ असे मृताचे नाव आहे. शिरहट्टी केडी गावातील रहिवासी वासू अर्जुन माळींगे आणि सिद्धप्पा लगमप्पा माळींगे यांनी त्याचा दारूच्या नशेत खून करून त्यांचे मृतदेह कब्बूर शहरातील सीबीसी कालव्याजवळ फेकून दिला होता. या प्रकरणी चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून कसून तपास केला. त्यात या दोघांनी भीमण्णाचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. चिक्कोडी डीवायएसपी बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय आर आर पाटील, पीएसआय बसनगौडा नेर्ली व सहकाऱ्यांनी आरोपींना अटक केली.
Belagavi
कब्बूर खूनप्रकरणी चिक्कोडी पोलिसांकडून २ आरोपींना अटक


Recent Comments