काँग्रेसने निवडणुकीपूर्वी महागाईने त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेला जाहीर केलेल्या 11 जूनला बस पास किंवा गृहज्योती, 15 ऑगस्टला गृह लक्ष्मी योजना, 10 किलो तांदूळ अन्नभाग्य योजना, युवा निधी योजना या सर्व पाच हमी योजना आम्ही टप्प्याटप्प्याने लागू करू असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, भाजपने काँग्रेस सरकारविरोधात केलेल्या आंदोलनाला मी प्रतिसाद देत नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील जनतेला किती आश्वासने दिली आणि आजवर किती पूर्ण केली, हे जनतेला समजल्यानेच जनतेने त्यांना धडा शिकवल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी सहाय्यकांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
गृह लक्ष्मी योजनेसाठी 1 ते 15 जुलै या कालावधीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. नगरविकास विभागासह आमच्या विभागातील कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी यांना गृहलक्ष्मी योजना राबवायची आहे. कुटुंबातील सदस्यांनी अर्ज करून घराचा मालक कोण आहे याची माहिती द्यावी. कदाचित थोडा वेळ लागेल. गृहलक्ष्मी योजना आपण सोप्या पद्धतीने राबविणार असून लवकरच सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहज्योती योजनेपासून भाडेकरू वंचित राहतील, अशी भिती असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सर्व योजनांवर अधिकारी आणि मंत्र्यांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. अशा अफवांना कोणीही प्रतिसाद देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली. महागाईने बेजार झालेल्या काँग्रेसने जनतेत आशा निर्माण केली आहे. पक्ष आपली आश्वासने पूर्ण करतो. भाडेकरू असतील, घरमालक असतील, कोणीही काळजी करू नये, आम्ही योजना राबवू, असे त्यांनी सांगितले.
घरमालक आणि भाडेकरू यांचा आरआर क्रमांक सारखाच असेल तर काय करणार? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, मी ऊर्जा मंत्री केजे जॉर्ज यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करेन. गृहलक्ष्मी योजनेवर मी बोलू शकेन, तुम्ही ही बाब माझ्या निदर्शनास आणून दिली हे बरे झाले, यावर ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे. जिल्हा विभाजनासाठी सुरुवातीपासूनच संघर्ष सुरू असून त्यावर आमचे सरकार कार्यवाही करेल. विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे. चिक्कोडी जिल्हा निर्मितीबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
गोहत्या बंदी कायद्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘मी एक महिला म्हणून तुम्हाला सांगते की, केवळ गोहत्याच नव्हे, तर कोणत्याही प्राण्याची हत्या मला चालत नाही.
अंगणवाडी सेविकांना मिळणारे अनुदान वाढविण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, ते आमच्या जाहीरनाम्यात हे वचन होते आणि त्यावर नक्कीच चर्चा करू. अधिकाऱ्यांशी बोलून कार्यवाही केली जाईल. अंगणवाडी सहाय्यकांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments