Belagavi

निसर्ग वाचवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य अन जबाबदारी : अमित कुलकर्णी

Share

निसर्ग वाचवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य अन जबाबदारी असे मत सेंद्रिय कृषीचे अभ्यासक व प्रगतशील शेतकरी अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

परमपूज्य श्री गुरुदेव रानडे यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावातील हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिर येथे अकादमी ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनच्या वतीने आयोजित तत्त्वज्ञ आणि अभ्यासकांच्या तीन दिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शेती, अध्यात्म, माणूस आणि निसर्ग यावर आधारित शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे सानिध्य पत्करलेले निडसोशीच्या श्री जगद्गुरू दुरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाचे श्री निजलिंगेश्वर महास्वामी यांनी एसीपीआरच्या वेब साईट आणि विकिपीडिया डिजिटायझेशनचे लोकार्पण केले. फ्लो
यावेळी सेंद्रिय कृषीचे अभ्यासक व प्रगतशील शेतकरी अमित कुलकर्णी यांनी व्याख्यान देताना सांगितले की, निसर्ग, नदी, पंच महाभूते जन्मल्यापासून आपल्यासोबत असतात. त्यांचे म्हणजेच पर्यायाने पर्यावरण वाचवणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे.

गाय आपल्या जीवनासाठी वरदान आहे, गायींच्या माध्यमातून आज आपल्याला दहा वेगवेगळ्या प्रकारे फायदा होत आहे. कोविड महामारीमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. यातून आपल्या सभोवतालचे सूक्ष्म जीव आपल्यावर आक्रमण करत आहेत हे दिसून येते. त्यामुळे याकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. बाईट.
तसेच कार्यक्रमात वाग्देवी संगीत महाविद्यालयाच्या श्रीमती वाग्देवी भट,

महेश फाउंडेशनचे संस्थापक महेश जाधव आदींचा सत्कार करण्यात आला. एसीपीआरचे अध्यक्ष अशोक पोतदार, सचिव एम बी जिरली, अमित कुलकर्णी, अप्पाजी कुलगुड आदी उपस्थित होते.

Tags: