Belagavi

आ. अभय पाटील यांनी केली वाजपेयी रस्त्याच्या कामाची पाहणी

Share

हिंदवाडी, बेळगाव येथील महावीर भवनाजवळील अटलबिहारी वाजपेयी मार्गाच्या रस्त्याच्या कामाचा एक टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला एल अ‍ॅण्ड टीची पाइपलाइन टाकण्याच्या कामामुळे विलंब होत आहे, वाहतूक सुरळीत करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. दक्षिणमध्ये 400 बोअरवेल्स खोदल्या असून, टंचाईच्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवणार असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

VOICE : आमदार अभय पाटील यांनी आज टिळकवाडीतील तिसरे रेल्वेगेट ते रेल्वे उड्डाणपूल या अटलबिहारी वाजपेयी मार्गाच्या व्हाईट टॉप काँक्रिटीकरण कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती देऊन त्यांनी सांगितले की, आज मी रस्त्याच्या कामाची सर्व माहिती घेतली. महावीर भवनच्या साई मंदिरासमोरील पाईप लाईन फुटली आहे. ती दुरुस्त करण्यास सांगितले आहे. आठ दिवसात डाव्या बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण होईल. तसेच ५० फूट काँक्रीटपैकी २५ फुटांचे काम पूर्ण झाले असून सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आरपीडी क्रॉस, दुसरे गेट ते चिदंबर नगर आदी भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाहतूक सुरळीत करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दक्षिण मतदारसंघातील शहरी भागात लवकरच 24X7 कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. दक्षिणध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी गेल्या 3-4 महिन्यात सुमारे 400 बोअरवेल्स खोदण्यात आल्या आहेत. अनगोळ नका येथे बिग बाजारसमोर आणि चावडी गल्ली, वडगाव येथे ओव्हरहेड टॅंक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तेथून अनगोळ, वडगाव, खासबाग, शहापूर भागाला रोज एक तास पाणी पुरवण्यात येईल. प्रात्यक्षिक स्वरूपाच्या या पुरवठ्यानंतर सहा महिन्यात 24X7 कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबविण्यात येईल.

त्याचप्रमाणे उद्यमबाग, कावेरीनगर, महाद्वाररोड भागात ओव्हरहेड टॅंक बसविण्यात येतील. जर कोण्याही भागात पाणीटंचाई जाणवत असेल तर नागरिकांनी त्यांच्या स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा, त्या भागात तातडीने टँकरने पाणी पुरवण्यात येईल असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. बाईट
यावेळी मनपा अधिकारी उपस्थित होते.

Tags: