Belagavi

अनगोळ ग्रामदेवता महालक्ष्मीदेवीचा वाढदिवस भक्तिभावाने

Share

अनगोळ ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त ओटी भरणेसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री ग्रामदेवी लक्ष्मी यात्रा उत्सव ट्रस्ट कमिटीच्या वतीने महालक्ष्मीच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच ओटी भरणे कार्यक्रमाला सुरुवात झाली. बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी देखील कुटुंबियांसमवेत महालक्ष्मीचे दर्शन घेऊन ओटी भरली. यानंतर दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनगोळ, भाग्यनगर, चन्नम्मानगर, टिळकवाडी, मच्छे , वडगाव, आनंदनगर, समर्थ नगरसह विविध भागातील भाविक महिलांनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन ओटी भरून दर्शन घेतले.

यावेळी श्री ग्रामदेवी लक्ष्मी यात्रा उत्सव ट्रस्ट कमिटीचे प्रमुख रविकांत पंडित यांनी ‘इन न्यूज-आपली मराठी’शी बोलताना अधिक माहिती दिली. बाईट.
मंगळवारी सायंकाळी अनगोळ येथील भजनी मंडळाकडून भजन सादर करण्यात आले. उत्सव ट्रस्ट कमिटीचे प्रमुख श्रीकांत पंडित, रविकांत पंडित, ईश्वर रतकर, प्रभाकर रतकर, मनोहर रतकर, प्रशांत सुतार, शशिकांत पंडित यांच्यासह गल्लीतील पंच कमिटीने या उत्सवाला हातभार लावला.

Tags: