गेल्या तीन-चार वर्षांत झालेल्या राज्याच्या विकासाकडे पाहता भाजपला येत्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.

बेंगळूर येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, काही मतदारसंघात आश्चर्यकारक निकाल दिसून येतील. यावर कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आत्मविश्वास असल्याचे ते म्हणाले. भाजपची उमेदवार निवड वस्तुस्थितीवर आधारित आहे. आज राज्य समितीची बैठक बोलावण्यात आली असून ती दोन दिवस चालणार आहे.

बैठकीनंतर उमेदवारांची यादी केंद्राकडे पाठवली जाईल. केंद्रात चर्चा करून शिक्कामोर्तब झाल्यावर 8 एप्रिल रोजी उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यावर प्रतिक्रिया देताना, त्यांना काहीतरी हवंय पण जनतेची नाडी काय आहे कुणास ठाऊक? निकालानंतर लोकांचे मत कळेल, असे ते म्हणाले. जनतेचा पाठिंबा असेल तरच आमदार होणे शक्य आहे.
सिद्धरामय्या काहीही नवीन बोलले नाहीत. काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार नाही. न मिळणाऱ्या जागेसाठी ते लढत असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी धावत आहे. त्यांनी कधी जनतेचे आणि कर्नाटकचे भले करण्याचा विचार केला नाही, असे ते म्हणाले.
सिद्धरामय्या जे म्हणाले ते त्यांच्या पक्षात घडत असलेल्या आंतरिक घटनांचे प्रतिबिंब आहे. केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदासाठी मला आशीर्वाद द्या असे म्हणत फिरत आहेत. ..
सिद्धरामय्या म्हणतात मी मुख्यमंत्री होणार आहे. लोकच एखाद्याला मुख्यमंत्री करतात, पण लोकांच्या मनात या दोघांचेही अस्तित्व नाही. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत. ते स्वप्न पूर्ण होणार नाही, असे ते म्हणाले.
आयनूर मंजुनाथ यांची बंडखोरी, भाजप आमदारांच्या पक्षांतरावर टिप्पणी करताना बोम्मई म्हणाले, आता 125 आमदार आहेत. पण काही ठिकाणी दोन-दोनजण इच्छुक आहेत. तेथे जागा न मिळाल्याने काहीजण निघून गेले आहेत इतकेच. याचा भाजप किंवा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. भाजपमधून पुन्हा कोण जाणार नाही. डीके शिवकुमार फक्त हवेत वक्तव्य करत आहेत असे बोम्मई यांनी सांगितले.
एकंदर, निवडणुकीत भाजप पुन्हा बहुमत मिळवेल, काँग्रेस केवळ सत्तेसाठी आटापिटा करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.


Recent Comments