Belagavi

बेळगाव अधिवेशनाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाहीय : चन्नराज हट्टीहोळी

Share

बेळगावात अधिवेशन घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाहीय अशी नाराजी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केली.

सुवर्णसौधमध्ये आज बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना चन्नराज हट्टीहोळी यांनी ही नाराजी व्यक्त केली. बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटक भागाचे प्रश्न सुटत नाहीत, केवळ शिष्टाचार म्हणून अधिवेशन घेण्यात येत आहे. अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होत नाहीयअशी टीका करून, उत्तर कर्नाटक भागात किती उद्योग आले? असा सवाल त्यांनी केला.

सुवर्णसौध येथे दर तीन महिन्यातून एकदा तरी मंत्रिमंडळाची बैठक झाली पाहिजे. कल्याण कर्नाटक भागामध्ये 10-14 लाख किमी धावलेल्या बसेस आहेत, नवीन बसेस द्याव्यात, आतापर्यंत उत्तर कर्नाटक भागासाठी एकही नवी बस खरेदी करण्याची ताकद सरकारकडे नाही का?, आमच्या भागातील आमदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे असे चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.

Tags:

the-purpose-of-the-belagavi-session-is-not-being-fulfilled/