Belagavi

यंग बेळगाव फौंडेशनकडून अर्धवट धोकादायक रस्ता कामाला कुंपण

Share

अपूर्णावस्थेतील रस्ता कामामुळे होणारी दुर्घटना टाळण्यासाठी यंग बेळगाव फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या कामाच्या भोवती कुंपण उभारून लाल कपडा बांधून लोकांना सावध करण्याचे काम केले आहे.

 

होय बेळगाव महानगरात विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र काही कामे अपूर्ण अवस्थेत पडून असून, जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देत आहेत. याचपद्धतीने नानावाडी येथील अंगडी महाविद्यालयासमोरील अपूर्ण रस्त्यावर खड्डेमय पॅच दिसत नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या काळजीपोटी यंग बेळगाव फौंडेशनच्या वतीने सोमवारी प्रवाशांना सावधपणे प्रवास करता यावा यासाठी रस्त्याच्या अपूर्ण भागाला कुंपण घालून लाल कापडाने झाकण्यात आले.
यावेळी बोलतांना युवा सामाजिक कार्यकर्ते ऍलन विजय मोरे यांनी, ठेकेदारांना अशी प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले. अपघात टाळण्यासाठी खड्डेमय रस्ते व अपूर्ण कामे निश्चित करण्याचे आवाहन केले.

यावेळी चेरिल विजय मोरे, सोनिया फ्रान्सिस, श्रीनिधी एच, शुभम सी, संस्कार सी, सिद्धार्थ आर, अक्षय एम, अद्वैत चव्हाण-पाटील, जय एस, देव जैन, ओंकार बी, आर्यन एन, ध्रुव एच, नितिन के, कार्तिक पी, अनिकेत एल., लकी एस, व इतर उपस्थित होते.
एकंदर यंग बेळगाव फौंडेशनने अपूर्ण रस्त्याच्या धोकादायक भागाला कुंपण घालून लोकांचा जीव वाचविण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. किमान आता तरी महानगरपालिका आणि स्मार्टसिटी अधिकारी जागे होतील का हे पहावे लागेल.

Tags: