मादिग समाजाला ए. जे. सदाशिव आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी हुक्केरी शहरात निषेध सभा घेण्यात आली.

महावीर ऐहोळे निजशरण मादार चेन्नईया यांच्या प्रतिमेचे पूजन केले व नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना 19 डिसेंबरपासून बेळगाव शहरात होणाऱ्या अधिवेशनात राज्यातील सुमारे 75 लाख समाजाला आरक्षण द्यायला हवे , मादिग समाज संघटितपणे सुवर्णसौध समोर तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला .

तालुकाध्यक्ष प्रकाश होसमनी म्हणाले की, मादिग समाज गेल्या अनेक वर्षांपासून समानतेसाठी लढा देत असून आता शासनाने समानतेची घोषणा करून आपल्या समाजाला न्याय द्यावा.
संकेश्वरचे नेते महेश हत्तीहोली यांनी बोलताना सांगितले की, हुक्केरी तालुक्यातील सर्व मादिग समाज बांधव आरक्षणासाठी सुवर्णसौधसमोर मोठ्या संख्येने लढा देणार आहेत .
यावेळी हुक्केरी, संकेश्वर, रायबाग , चिक्कोडी भागातील मादार चेन्नया समाजाचे नेते शशिकांत होन्नाळी , महितप्पा मादार , सदाशिव मादार , सुमित मादार , संजीव कट्टीमणी, केम्पण्णा मांदार अर्जुन माळगे , महादेव मादार आदी उपस्थित होते.


Recent Comments