चिकोडी तालुक्यातील इंगळी या गावात सैन्यदलातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य अण्णासाहेब पवार हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी, सैन्यदलाच्या कार्याचा सन्मान करत देशाप्रती सैन्य दलातील जवानांच्या योगदानाचे कौतुक केले. भारत देश हा पवित्र , समृद्ध आणि शांतीप्रिय देश असून संपूर्ण जगाला भारताने विश्वशांतीचा संदेश दिल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.


या कार्यक्रमात इंगळी गावातून अलीकडेच भरती झालेल्या ५ जवानांचा, सध्या कार्यरत असणाऱ्या ३ जवानांचा आणि निवृत्त झालेल्या २२ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त सैनिकांनी गावातील तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या गावाची कीर्ती वाढविण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी सैन्यदलात सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.
यावेळी भारतीय सैन्यदलात भरती झालेले सुशांत पवार, किरण पाटोळे, रोहन बामणे, निलेश कुंभार, ओंकार जत्राटे यांच्यासह सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास श्रीपती जाधव, वसंत माने, अण्णासाहेब घोसरवाडे, अण्णासाहेब चौगुले, सदाशिव जाधव, राजू शेट्टी, शिवाजी शिंदे, मोहन बामणे, पोपट कांबळे, कुमार पाटील, अशोक मिर्जी, ज्योतिबा कावळे, आनंद खुठे, रमेश माने, संजय गुरव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शंकर पवार यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. सर्जेराव जाधव यांनी आभार मानले.


Recent Comments