Belagavi

ईद मिलाद मिरवणूक पाहण्यास जाणाऱ्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

Share

ईद मिलाद मिरवणूक पाहण्यास जाताना मुलांसोबत खेळत असताना विहिरीत पडून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बेळगावातील अनगोळ येथे घडली.
रविवारी दुपारी राजहंस गल्ली, अनगोळ येथे एक दुर्दैवी, हृदयद्रावक घटना घडली. सादीद मुजम्मील मुल्ला या 11 वर्षीय दुर्दैवी मुलाचा खेळताना तोल जाऊन धामणेकर यांच्या विहिरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाला. ईद मिलाद साजरी करण्यासाठी सादिदा मुजम्मील मुल्ला आपल्या नातेवाईकाच्या घरी आला होता. तो मूळचा एमके हुबळी गावचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

सादीद आपल्या मित्रांसोबत खेळत असताना विहिरीत पडला. त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी ही बाब घरच्यांना सांगितली. तातडीने त्याला बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. टिळकवाडी ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

angol little boy death death in well eid day death