सरकारवर विश्वास ठेवून सरकारी एपीएमसी मध्ये व्यापाऱ्यांनी दुकान खरेदीसाठी पैसे दिले होते. सदर पैसे परत करण्यात यावेत, असा आग्रह बेळगाव जिल्हा घाऊक भाजी व्यापारी कल्याण संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला आहे.

बेळगाव शहरात जय किसान खाजगी भाजी मार्केट सुरु झाल्यानंतर सरकारी एपीएमसी मधील भाजी विक्री मंदावली आहे. सरकारी एपीएमसीमधील घाऊक भाजी विक्रेत्यांनी मालमत्तेवर कर्ज घेऊन एपीएमसीमध्ये दुकाने खरेदी केली आहेत. खाजगी एपीएमसीमुळे सरकारी एपीएमसीच्या व्यापाऱ्यांना फटका बसला असून व्यापारी अडचणीत सापडले आहेत. व्यापाऱ्यांनी सरकारी एपीएमसीमधील दुकानांसाठी दिलेली रक्कम परत करण्यात यावी, असा आग्रह बेळगाव जिल्हा घाऊक भाजी व्यापारी संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मंडळी आहे. एपीएमसीमध्ये निविदा मागविताच सरकार वर विश्वास ठेवून येथील दुकाने खरेदी केली आहेत. मात्र आता अचानक राष्ट्रीय महामार्गाशेजारी खाजगी एपीएमसी स्थापन करून व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्यात आले आहे. सरकारी एपीएमसीमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून याठिकाणी दुकाने घेण्यासाठी जमिनी आणि घरावर कर्ज काढले आहे. आधीच कोरोनामुळे गेली २ वर्षे आपण अडचणीत आहोत. त्यात हि भर पडली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारी एपीएमसीमधील दुकाने खरेदी करण्यासाठी दिलेले पैसे सरकारने परत करावेत, अशी मागणी करत आज बेळगावमधील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत निवेदन सादर केले आहे. हे निवेदन सादर करतेवेळी सरकारी एपीएमसी भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments