मावळते जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बेळगाव जिल्हयाचे व जनतेचे मन जिंकले आहे असे हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

व्हॉईस : बेळगावात विविध खात्यांचे अधिकारी, कुमारस्वामी वसाहत रहिवाशी संघ आणि वन्यजीव पर्यावरण विकास वेदिके आणि मित्रमंडळींनी कुमारस्वामी रॉयल गार्डन येथे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांचा शनिवारी सायंकाळी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी हुकेरी हिरेमठचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांचे भाषण झाले. ते म्हणाले, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी त्यांच्या कुशल कार्यपद्धतीने प्रशासनातील सर्व खात्यांची मने जिंकली आहेत. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे वागविले. त्यांचे वेळ-काळाचे भान, कार्यप्रणाली, समानता, दलितांबद्दलची काळजी याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांची बदली झाली म्हणून मी त्यांचा सत्कार करायला आलो नाही. त्यांच्या अद्वितीय गुणांमुळे मी त्यांचा आदर करायला आलो आहे. त्यांचे गुण आत्मसात केले तर राज्य, देश समृद्ध होऊ शकतो असे स्वामीजींनी सांगितले.


यावेळी बेळगावहुन बदली झाल्यानिमित्त जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मावळते जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले, बेळगाव हा माझा गृह जिल्हा असल्यामुळे येथील लोकांची सेवा करून मला खूप समाधान लाभले आहे. येथील अनुभव अविस्मरणीय आहे. मित्रमंडळींचे संबंध अविस्मरणीय आहेत. येथे काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी सरकारचे आभार मानू इच्छितो. प्रशासनाला साथ देणारी सर्व जनता, नेते, आमदार, मंत्री, मित्र, संघ-संस्था यांना मी कधीच विसरणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगणावर, जंगम समाजाचे नेते, अरविंद जोशी, एम. डब्ल्यू. हिरेमठ, एस. सी. नायक, जी. एस. हिरेमठ, रुद्रण्णा चंदरगी, पी. आय. पाटील, वन्यजीव व पर्यावरण वेदिकेचे सदस्य, श्रीशैल मठद, जगदीश मठद, प्रा. मारुती कदम, रवींद्र कुलकर्णी, एस. जी. कल्याणी, बसवराज गौडप्पगोळ, हुलकुंद, यांच्यासह कुमारस्वामी वसाहत रहिवाशी संघ तसेच विविध संघ-संस्थांचे सदस्य आदी उपस्थित होते.


Recent Comments