१ मे रोजी महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा झाला. दरम्यान महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सीमावासियांच्या पाठीशी आपला पाठिंबा असल्याचे व्यासपीठावर नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सीमावासीयांना धीर मिळाला आणि याचे पडसाद सोशिअल साईटवर उमटू लागले. मात्र याचा त्रास आता मराठीद्वेष करणाऱ्यांना होत असल्याचे जाणवत आहे..

व्हॉइस : बेळगावसह बिदर, भालकी, कारवार, निपाणी आणि ८६५ खेडी महाराष्ट्रतात विलीन होऊ शकली नाही, याची आपल्याला खंत असल्याचे अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटले. सीमावासीय देत असलेल्या लढ्याला आपला पाठिंबा आहे, असे मत व्यक्त केल्यानंतर मराठी भाषिकांनी सोशल साईटवर हि पोस्ट शेअर केली. आणि यावरून आता मराठी द्वेष्ट्यांना पुन्हा ऊत आला आहे.
गेली ६५ वर्षे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आलेल्या मराठी बहुल भागातील मराठी भाषिक जनतेची सीमाप्रश्न सोडविण्यासाठी तळमळ सुरु आहे. यावरून सीमाभागातील राजकारण नेहमीच तापलेले असते. महाराष्ट्रात जाण्याची आस ठेवलेल्या मराठी भाषिकांना नेहमीच कन्नड संघटना लक्ष्य करत असतात. लोकशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असूनही केवळ सीमाभागातील मराठी भाषिकांना आपली मते, विचार मांडण्याचा हक्क आणि अधिकारापासून वंचित राहावे लागते. अजित पवारांच्या प्रतिक्रियेनंतर देखील असाच काहीसा प्रकार सीमाभागात पाहायला मिळत आहे.

कन्नड संघटनांच्या क्रिया समितीच्या अशोक चंदरगी यांनी या विरोधात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून याचा सारा दोष महाराष्ट्र एकीकरण समितीला दिला आहे. ()
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनीही अजित पवार यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून आपल्या राज्यातील एक इंच जागादेखील आपण देणार नसल्याचे म्हटले आहे. ()
महाराष्ट्रातील राजकीय मंडळी जाणीवपूर्वक अशा गोष्टी करत असल्याचे कन्नड संघटना आणि तथाकथित राजकीय मंडळींचे म्हणणे आहे. परंतु बेळगाव आणि सीमाप्रश्नासाठी सुरु असलेल्या लढ्यात मराठी भाषिकांनी कोणता त्याग केला आणि किती बलिदान दिले याची कल्पनाच न केलेली बरी.


Recent Comments