: शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील संपूर्ण व्याजदरात सवलत द्यावी आणि मूळ व्याजदरात २५% कपात करावी अशी मागणी नेगीलयोगी शेतकरी संघटनेने केली आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे गेल्या तीन वर्षांत प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण लॉक डाऊन आणि बाजाराची झालेली अवस्था यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितदेखील शेतकऱ्यांवर कर्जफेडीसाठी दबाव आणून दादागिरी करण्यात येत आहे. यासंदर्भात आज नेगीलयोगी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नेगीलयोगी रयत संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील म्हणाले, सरकारच्या खजिन्यात पैसा नसल्याचे सांगत शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करण्यात येत आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सभा घेऊन कोट्यवधी रुपये खर्च होतात. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या पगारात २५ टक्के वाढ केली जाते.. यावेळी सरकारी खजिन्यात पैसे कुठून येतात? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांची बँकांकडून होणारी पिळवणूक थांबवावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रवी पाटील यांनी दिला.
यावेळी नेगीलयोगी रयत संघाचे राज्य संघटना सचिव बिरापा देशनुर बोलताना म्हणाले, राज्यात तिन्ही पक्ष निवडणुका, पैसा आणि अधिकाराच्या मागे लागले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव नाही त्यामुळे बँकेत कर्ज भरण्याची शक्ती शेतकऱ्यांकडे नाही. यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहे. याप्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या आंदोलनात नेगीलयोगी रयत संघाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.


Recent Comments