खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक तीर्थक्षेत्र कक्केरीला तहसीलदार प्रवीण जैन यांनी भेट देऊन बिष्टादेवीचे दर्शन घेतले.

खानापूरच्या तहसीलदारपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रवीण जैन यांनी प्रथमच कक्केरी येथे भेट देऊन बिष्टादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा कक्केरी बिष्टादेवी मंदिर समितीतर्फे सत्कार करण्यात आला. तहसीलदारपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रवीण जैन यांनी तालुक्यातील ऐतिहासिक मंदिरे, तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन पाहणी करण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार कक्केरीला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसील कचेरीचे सादिक पाच्छापुरे व इतर उपस्थित होते. 



Recent Comments