बागलकोट जिल्यातील मुधोळ विधानसभा मतदार संघाच्या व्याप्तीतील बेळगलीचे सुपुत्र डॉ. चिदानंद कुंभार बेळगली यांनी नीट पीजी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

नीट पीजी परीक्षेत ७५९ गुण संपादन करून बागलकोट जिल्यातील मुधोळ विधानसभा मतदार संघाच्या व्याप्तीतील बेळगलीचे सुपुत्र डॉ. चिदानंद कुंभार बेळगली यांनी यश संपादन केले आहे. मुधोळचे आमदार व जलसंपदामंत्री गोविंद कारजोळ यांनी या विद्यार्थ्याचे दूरध्वनीवरून संपर्क साधून कौतुक केले आहे.

आपल्याला एमबीबीएस अभ्यासक्रमात साहाय्य केलेल्या प्रत्येकाचे डॉ. चिदानंद कुंभार यांनी कौतुक केले. डॉ. चिदानंद कुंभार यापुढे Gastro एन्टेरोलॉजि (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) चे अध्ययन करणार आहेत.


Recent Comments