त्रिमंडळ विस्तार तात्काळ करण्यात यावा. अन्यथा काही अवधीत निवडणूक जवळ येईल आणि तोवर बंगळूरमध्ये बसून मतदार संघ गमवावे लागतील, अशा शब्दात आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी असमाधान व्यक्त केले आहे.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना यत्नाळ म्हणाले, संक्रांति नंतर राज्याच्या राजकारणात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मंत्रिमंडळ विस्तार आतापर्यंत होणे गरजेचे होते. परंतु अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला नाही. मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आल्यास राज्याची चांगली प्रगती होईल, असे मत यत्नाळांनी व्यक्त केले.

यानंतर बोलताना यत्नाळ म्हणाले, राज्यात सक्रिय नेतृत्वाची गरज आहे. येडियुराप्पांसह आता कर्नाटकातील चार पाच जणांचे युग संपले असून अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर जसे भारतात मोदींचे राज्य आले तशी गरज कर्नाटकात असल्याची प्रतिक्रिया यत्नाळांनी व्यक्त केली.
लक्ष्मण सवदी भाजप सोडून जाणार नाहीत हे मी आधीच सांगितले होते. पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. यामुळे आता ते पक्ष सोडून जाणारच नाहीत. आगामी निवडणुकीत पक्ष माझ्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवेल असा मला विश्वास आहे, असे मत यत्नाळांनी व्यक्त केले.
रमेश जारकीहोळी यांच्या भेटीसंदर्भात देखील आमदार यत्नाळांनी प्रतिक्रिया दिली असून रमेश जारकीहोळी हे आपल्या विजापूर येथील निवासस्थानी केवळ यावेळी कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसल्याचे आमदार बसनगौडा पाटील यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्ताराची नितांत गरज असल्याची प्रतिक्रिया आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी व्यक्त केली असून मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात केव्हा निर्णय घेतील हे पाहणे बाकी आहे.


Recent Comments