Hukkeri

नदाफ पिंजार संघाच्या वतीने कोविड मृतांच्या कुटुंबियांना धनादेश

Share

हुक्केरी तालुक्यातील कोविड मुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना नदाफ पिंजार संघाच्या वतीने धनादेशाचे वितरण करण्यात आले.

हुक्केरी तालुक्यातील नदाफ पिंजार समाजाच्या कार्यालयात नदाफ अध्यक्ष मुसा नदाफ आणि उपाध्यक्ष शौकत नदाफ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या सभेची सुरुवात जावेद नदाफ यांनी कुराण पठण करून केली. यानंतर कोरोनामुळे निधन झालेल्या अर्जुनवाड येथील अस्लम नदाफ यांच्या पत्नीकडे रुपये दहा हजारांचा धनादेश सोपविण्यात आला.

यानंतर वकील शौकत नदाफ यांनी बोलताना सांगितले कि , पिंजार समाजाच्या अस्लम नामक व्यक्तीचा गेल्या वर्षी कोविड मुळे मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी राज्य नदाफ पिंजार समाजाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

यावेळी अकरा जमातीचे उपाध्यक्ष सलीम नदाफ, इम्तियाज नदाफ, गौस नदाफ, मिरसाब नदाफ, अब्दुल रंजक, मुनीर नदाफ, इसुब नदाफ, महम्मदगौस नदाफ आदी उपस्थित होते.

Tags: