Hukkeri

संकेश्वरात काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान

Share

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संतोष मुडशी यांच्या नेतृत्वाखाली संकेश्वरात काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. संकेश्वरसह नेरली, भैरापूर आदी गावात हे अभियान राबविण्यात आले.

या संदर्भात माहिती देताना पालिका सदस्य दिलीप होसमनी म्हणाले, केपीसीसीच्या आदेशानुसार हुक्केरी तालुक्यातील विविध गावांत हे अभियान राबविण्यात येत आहे. लवकरच बूथ पातळीवर हे अभियान राबवून पक्ष तळापासून मजबूत करण्यावर भर देण्यात येईल.

यावेळी काँग्रेस कामगार विभागाचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष महेश हट्टीहोळी, काँग्रेस जिल्हा सचिव अविनाश नलवडे, संकेश्वर महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा नम्रता वैरागी, संयोजक सुधाकर बडिगेर, समाज माध्यम विभागाचे अध्यक्ष शिवशंकर भोसले, निलेश जाधव, मुक्तार नदाफ, काँग्रेस पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

Tags: