बेळगाव शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या परिणामी पार्किंगची समस्या डोकेदुखी ठरत आहे . बेळगावचा विकास स्मार्ट सिटीच्या दिशेने होत चालला असला तरी शहरातील नागरिकांना अद्यापही पार्किंगची समस्या सतावत आहे . अशातच अनेकवेळा लोकप्रतिनिधींना वारंवार कळविण्यात येउंदेखील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत .

बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या यादीत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अनेक विकासकामेही याठिकाणी राबविण्यात येत आहेत . परंतु जनतेच्या पार्किंगचा प्रश्न मात्र अद्यापही आवासून उभा आहे . स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत . शहरातील धर्मवीर संभाजी चौक, लिंगराज कॉलेज रोड, राणी चन्नम्मा चौक मार्ग, केएलईस रोड, यासह शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या उद्भवत आहे. शिवाय यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमकदेखील उडत असलेल्या पाहावयास मिळत आहेत .

यासंदर्भात आमच्या इन न्यूजशी बोलताना वकील एम एस सनदी यांनी सांगितले कि, बेळगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .
१० वर्षांपूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या नव्हती . मात्र आता लोकसंख्येचे प्रमाण वाढले असून त्यानुसार शहरात पार्किंगची सोय करण्यात आली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली . जनतेला आपले वाहन थांबविण्यासाठी अनेक अडचणी समोर येत असून रहदारी पोलिसांच्या नियमांची डोकेदुखी ठरत असल्याची तक्रारही त्यांनी केली . कर्जावर वाहन घेणाऱ्या अनेक नागरिकांना पार्किग च्या समस्येमुळे दंड देखील भरावा लागत असल्याने नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत . प्रशासनाने त्वरित हि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह वकील सनदी यांनी केला .
यावेळी ज्येष्ठ वकील अशोक पोतदार बोलताना म्हणाले, बेळगावमध्ये अधिकारी, किंवा मोठ्या लोकांसाठी वाहन पार्किंगचा कोणताही त्रास नाही . परंतु सामान्य जनता पार्किंगच्या समस्येला वैतागली आहे . शहरात योग्य पार्किंग ची व्यवस्था करण्यात यावी असा आग्रह अशोक पोतदार यांनी केला .
शहरात अनेक ठिकाणी पार्किगसाठी आणि होत असलेल्या वाहतूक कोंडीसाठी रास्ता रुंदीकरण करण्यात आले आहे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे। मात्र सर्वसामान्य नागरिक अद्यापही पार्किंगच्या सुविधेपासून वंचित आहेत। प्रशासनाने याबाबत लक्ष पुरवून शहरातील हि महत्वाची समस्या सोडविण्यासाठी लक्ष पुरविण्याचे आवाहन नागरिक करत आहेत


Recent Comments