काँग्रेसने विधान परिषदेसाठी आपल्याला हव्या त्या आणि धनवान नेत्याला उमेदवारी दिली आहे. पण त्याला जनता नाकारेल असा दावा पंचायतराज आणि ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केला.


बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री ईश्वरप्पा म्हणाले, १२ डिसेंबरला बेंगळुरातील राजवाडा मैदानावर राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी १० मागासवर्गीय नेत्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी बेळगाव आणि चिक्कोडी येथे विभाग पातळीवर सभा घेणार आहे. बेंगळुरातील मेळाव्याला राज्यभरातून ३,५०० दलित नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले. बाईट

‘रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसवर अन्याय केला’ या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या आरोपावर ईश्वरप्पा यांनी, रमेश यांनी अन्याय केल्याचे त्यांना आता समजले का? इतके दिवस त्या काय करत होत्या? असा सवाल केला. काँग्रेस नेत्यांनी आपल्याला हव्या त्या, नात्यातील आणि धनवान नेत्याला विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. पण लोक त्यांना नाकारतील. रमेश जारकीहोळी भाजपात आले हे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना सहन होत नसावे असा पलटवार त्यांनी केला. बाईट
रमेश जारकीहोळी आपले बंधू लखन यांच्यासाठी प्रचार करत असल्याबाबत ईश्वरप्पा म्हणाले, रमेश यांनी मतदारांना पहिल्या पसंतीचे मत भाजपला देऊन दुसऱ्या पसंतीचे मत लखन यांना द्या अशी मतयाचना केली आहे. त्याचा भाजपवर परिणाम कसलाही होणार नाही. भाजप उमेदवार आपली निर्दिष्ट मते मिळवून विजयी होईलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट एकंदर विधान परिषद निवडणुकीत आता चांगलाच रंग भरू लागला आहे. सगळेच नेते आपल्याच पक्षाचा विजय होणार असा दावा करत आहेत. या धामधुमीत मतदार राजा कोणावर प्रसन्न होणार हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.


Recent Comments