Belagavi

सुरळीत बससेवा पुरविण्यासाठी जांबोटी विद्यार्थ्यांचा आग्रह

Share

खानापूर तालुक्यातील जांबोटी गावातील विद्यार्थ्यांनी योग्य बससेवेची व्यवस्था करण्याचे आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जांबोटी येथील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गेल्या दोन वर्षांपासून जांबोटी भागासाठी बससेवा योग्य पद्धतीने पुरविण्यात येत नसून यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अपुऱ्या बससेवेमुळे अडचणी निर्माण होत आहेत. खानापूर जांबोटी भागात सुरळीत बससेवा पुरविण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. (फ्लो)

यावेळी सोनाली सुधाकर गावडे या विद्यार्थिनीने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले कि, सकाळी ८ वाजता जांबोटी येथून बसमध्ये चढल्यावर बेळगावमध्ये पोहोचण्यासाठी ८ वाजतात. तोवर दोन क्लास चुकतात. सकाळी पणजीची बस आहे. परंतु पस नसल्यामुळे या बसमधून जात येत नाही. यामुळे सकाळी ६ वाजता आणि दुपारी २ वाजता पुन्हा एका बसची सोय करण्यात यावी, असा आगह आम्ही करत आहोत, असे या विद्यार्थिनीने सांगितले.

संबंधित अधिकारांनी याप्रकरणी लक्ष देऊन हि समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.

Tags: