हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी गावात नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण : योजना आणि अंमलबजावणी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महांतेश्वर विद्या ट्रस्ट, व्ही. एम. कत्ती ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वे राष्ट्रीय शिक्षण धोरण : योजना आणि अंमलबजावणी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांच्याहस्ते वृक्षारोपणाची या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राणी चन्नम्मा विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक दशरथ आबाळ, ट्रस्ट कमिटी सदस्य सुजित कत्ती, गिरीगौडा पाटील, अशोक बेल्लद, प्राचार्य व्ही. एस. हुगार, श्रीशैल हिरेमठ, एन. बी. तेरदाळ, के. सी. मुचखंडी आदी उपस्थित होते.

यावेळी पवन कत्ती बोलताना म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार कर्नाटकात पहिल्यांदाच अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना आणि प्राचार्यांसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून सदर राज्यस्तरिय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या विविध विषय प्रमुख प्रो. व्ही. एस. शीगीहळ्ळी, बी. एस. नाव आणि के. बी. चंद्रिका यांचे व्याख्यान झाले.
यावेळी व्ही. एम. कत्ती ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.


Recent Comments