Belagavi

बिटकॉइन घोटाळ्यात थेट कारवाई करा : जारकीहोळींचे सरकारला आव्हान !

Share

बिटकॉइन घोटाळ्यात थेट कारवाई झाली पाहिजे. यात हा आहे, तो आहे, ‘हात लावून तर बघम्हणत बसण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा यात काँग्रेसचे सहभागी असोत भाजपचे थेट कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी केली.

बेळगावातील काँग्रेस भवनात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, बिटकॉइन घोटाळ्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात काय अर्थ आहे? आज सायंकाळी दाखवतो, उद्या दाखवतो, स्फोट घडवून आणतो म्हणत बसायची काय गरज आहे? थेट स्फोट घडवून आणा. सत्ता त्यांच्या (भाजपच्या) हातात आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. मग सहभागी असल्यानं पकडण्यात काय अडचण आहे? यात काँग्रेसचे असोत किंवा भाजपचे, सहभागी असलेल्यांवर पोलिसांनी थेट कारवाई करावी अशी मागणी जारकीहोळी यांनी केली.  हॅकिंग करणे ही सुद्धा एक कला आहे. रात्री घरात बसूनही हॅकिंग करता येते.

मित्रांना भेटणे आणि हॅकिंगचा काही संबंध नाही. असेल तर, पोलिसांच्या हातात अधिकार आहे. सिद्ध करून दाखवावे. उगाच एकमेकांवर आरोप करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ईडीकरवी तपास करताहेत असे आ. जारकीहोळी यांनी राज्य सरकारला उद्देशून सांगितले. बेळगाव पालिकेची निवडणुकीतील प्रभावावर प्रतिक्रिया देताना आ. जारकीहोळी म्हणाले, विजयासाठी भाजपने कसली मोठी जादू, साहस केलेले नाही. मते फुटल्याने त्यांना तेवढ्या जागा मिळाल्या आहेत. अनेकजण निवडणुकीत उतरल्याने भाजपला त्याचा फायदा झाला. ‘उत्तर’मध्ये ४-५ आणि ‘दक्षिण’मध्येही तितक्याच जागा आम्ही जिंकलो असतो. किमान १८-२० जागा आम्ही जिंकू शकलो असतो. भाजप व महाराष्ट्र एकीकरण समितीलाही तेवढ्याच जागा मिळाल्या असत्या. मात्र आमच्यात एकमत झाले नाही.

कोण उमेदवार हे समजले नाही. काहीजणांनी जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केल्याने आमचा पराभव झाला असे आ. जारकीहोळी यांनी सांगितले.  विधान परिषद निवडणुकीसाठी बेळगावातून तिघांनी, चिक्कोडीतून पाचजणांनी अशा एकूण ८ जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विवेकराव पाटील यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेणार आहेत. १४ रोजी होणाऱ्या सभेला ते येणार आहेत. आम्ही सर्वांना प्राधान्य देऊ. काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चर्चेच्या पातळीवर आहे. अंतिम टप्प्यात नाही अशी माहिती आ. जारकीहोळी यांनी याबाबतच्या प्रश्नावर दिली.

 

 

Tags: