बेळगाव महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या प्रयत्नामुळे एका निराधार अनाथ युवकाला आसरा मिळू शकला.

होय, बेळगाव शहरातील कॉलेज रोडवरील सरदार्स हायस्कुल मैदानाजवळ कम्पाउंडला लागून झोपलेल्या या युवकाला आई-वडील नाहीत. त्याला स्वतःचे घरही नाही. इतके दिवस तो हिंडलगा रस्त्यावर कडेला झोपून जगत होता. त्याच्याबद्दल कोणीतरी सोशल मीडियावर त्याचा फोटो टाकून कोणीतरी आसरा द्या असे आवाहन केले होते. याबाबत माहिती मिळताच पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी या युवकाला रातोरात महापालिकेच्या खासबाग येथील निराधार केंद्रात दाखल करण्याची व्यवस्था केली. आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या या माणुसकीचे अनेकांनी कौतुक केले.



Recent Comments