Belagavi

शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करा : उदपुडी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

रामदुर्ग तालुक्यातील उडापुडी गावातील शिवसागर साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱयांची ऊसबिले थकीत ठेवण्यात आली असून, सदर थकीत बिले त्वरित अदा करण्याची मागणी करत कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले.

: बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कर्नाटक राज्य संयत संघ आणि हसीरू सेनेच्या नेतृत्वाखाली शिवसागर साखर कारखान्याविरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून थकीत असलेल्या बिलांची रक्कम अदा करण्याची मागणी करत आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत शेतकऱ्यांची ऊस बिले निघत नाहीत, तोवर कारखान्याच्या आवारात कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही काम करू शकत नाही, असे आदेश न्यायालय आणि तहसीलदारांनी दिले आहेत. परंतु न्यायालय व शासनाच्या आदेशांची पायमल्ली करून सरकार समर्थक गट अनधिकृतपणे कारखान्याच्या आवारात कारखान्याशी संबंधित विविध कामे करत आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून शिवसागर कारखान्यातील अवैध धंदे बंद करून ऊस उत्पादक शेतकरी व ट्रॅक्टर मालकांना पैसे द्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यासंदर्भात आमच्या इन न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना कर्नाटक राज्य रयत संघाचे आणि हसीरू सेनेचे राज्याध्यक्ष चोन्नप्पा पुजारी बोलताना म्हणाले, सदर कारखान्याचे मालक राजेंद्र पाटील हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून स्वतः श्रीमंत होत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ऊस बिले थकीत ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून सादर मालकाची मालमत्ता जप्त करून थकीत बिले अदा करण्याची मागणी केली.

यावेळी आणखी एका शेतकरी नेत्याने बोलताना सांगितले कि शिवसागर साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी २०१३ पासून २०१६ पर्यंतची ऊसबिले थकीत ठेवली आहेत. २०१६ पासून आम्ही आंदोलन करत असून राजेंद्र पाटील हे इतरत्र कारखाना चालवत असल्याचा आरोप या शेतकरी नेत्याने केलाय

या आंदोलनात शेतकरी नेते परमेश्वर मुळळूर, रवी सिद्धमानवर, यल्लाप्पा होसमनी, शिवानंद दोडवाड, सुरेश गुंजेरी, इराप्पा राजनाळ यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

Tags: