सध्या देशात दिवाळीचा हंगाम आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. शिवाय बाजारपेठेतदेखील गर्दी पाहावयाला मिळत आहे. परंतु अद्याप कोरोनाचा धोका टळला नसून कोविड संदर्भातील सर्व मार्गसूचीनुसार आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे, असे कोविड तज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

देशात नागरिक सध्या दिवाळीची तयारी करण्यात मग्न आहेत. संपूर्ण देशात भव्य प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोविड मुळे दिवाळी भव्य प्रमाणात साजरी करणे नागरिकांना शक्य झाले नाही. सध्या कोविड नियंत्रणात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत नागरिक आहेत. परंतु अद्याप कोविड चा धोका टळला नसून नागरिकांनी कोविड संदर्भातील आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याची गरज आहे, असे कोविड तज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

दिवाळीच्या दरम्यान सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सामाजिक अंतर राखून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments