जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अनेक सुविधांपासून वंचित असून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी बेळगाव आम आदमी पक्षाने केली आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्य ऊस उत्पादनात देशपातळीवर तिसऱ्या स्थानी आहे. मात्र बेळगावमधील ऊस उत्पादक शेतकरी मात्र अनेक दृष्टिकोनातून वंचित आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी त्वरित देण्यात यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

चालू वर्षाचा उसाचा भाव वाहतूक दर वगळून ३५०० रुपये प्रतिटन या प्रमाणे देण्यात यावा, उसाचे वजन योग्य पद्धतीने हाताळण्यात यावे, शेतकऱ्यांनी ऊस दिल्यानंतर १४ दिवसांच्या आत बिल भरावे. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन धन आणि विविध सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी आम आदमी पक्षाचे विजय पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी आम आदमी पक्षाचे एस. वाय कलारकोप्प, शंकर हेगडे, अब्दुल टी. शेख, कुमुदिनी भैराप्पन्नावर भैरू पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments