शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची तपासणी करण्याचे साधन म्हणजे परीक्षा. परीक्षेची गोपनीयता राखून सर्वांनी परीक्षेचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे, असे मत बेळगावच्या पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक नागराज व्ही यांनी व्यक्त केले.

पदवीपूर्व शिक्षण विभाग, बेळगाव जिल्हा प्राचार्य संघ आणि जेजीआय संस्थेचे जैन पदवी पूर्व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जैन महाविद्यालय येथे पीयूसी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सहामाही परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेच्या पूर्वतयारीसंबंधित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेची सुरुवात विवीध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. 

यावेळी पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक नागराज व्ही बोलताना म्हणाले, पदवीपूर्व विभागाने तयार केलेल्या ब्ल्यू प्रिंटनुसार दर्जेदार प्रश्नपत्रिका तयार करण्यात याव्यात. कोणत्याही गोष्टी अपूर्ण राहू नयेत यासाठी जागृती कार्यक्रम देखील हाती घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
यानंतर प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष आणि सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य बी. वाय हुन्नूर बोलताना म्हणाले, कोविड पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या परीक्षा अत्यंत महत्वपूर्ण आहेत. या परीक्षांचे निकाल निर्णायक ठरण्याची साध्यता आहे. यामुळे सर्व महाविद्यालयांनी पदवीपूर्व विभागाने एकसमान प्रश्नपत्रिका तयार करणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी प्राचार्या रोहिणी केबी, एम के भजंत्री, प्राचार्य के. पी. शिवराई, के. एन. दोड्डमनी, प्राचार्य कोदन्नवर आदी उपस्थित होते.


Recent Comments