Belagavi

बांगला देशातील हिंदूंवरील हल्ल्याचा निषेध

Share

बांगला देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ बेळगावात मंगळवारी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली

विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावात चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढला. पाकिस्तान, अफगाणिस्तानसह बांगला देशात मुस्लिम कट्टरतावाद्यांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात येत आहेत. त्याचा जोरदार घोषणा देत यावेळी निषेध करण्यात आला. 

यावेळी बोलताना कृष्ण भट म्हणाले, पाकिस्तान, अफगाणिस्तानसह बांगला देशात मुस्लिम कट्टरतावाद्यांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात येत आहेत. या अत्याचाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. बांगला देशातून भारतात येणाऱ्या हिंदूंना आसरा दिला पाहिजे अशी मागणी केली. यावेळी रणकुंडये गावात मंदिर पडल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला.

यावेळी बोलताना बसवराज भागोजी म्हणाले, बांगला देशातील हिंदू मंदिरांचा विध्वंस, हिंदू महिलांवरील अत्याचार, हिंदू साधूंच्या हत्या आदी अत्याचारांच्या निषेधार्थ आम्ही देशभर आंदोलन सुरु केले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत हस्तक्षेप करून तेथील सरकारशी बोलून हिंदूंना संरक्षण मिळवून द्यावे असे आवाहन केले.

त्यानंतर बांगला देशातील हिंदूंवर हल्ले करणार्यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, पीडित हिंदूंना संरक्षण आणि भरपाई मिळवून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. यावेळी श्रीकांत कदम, विजय जाधव आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Tags: