सरकारी आणि निमसरकारी इमारतींवर कन्नड ध्वज लावण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, तसेच भव्य प्रमाणात राज्योत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, या मागण्यांसाठी बेळगावमधील विविध कन्नड संघटनांनी आज आंदोलन छेडले.

बेळगाव कन्नड साहित्य भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारापर्यंत सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. या निवेदनात : सरकारी आणि निमसरकारी इमारतींवर कन्नड ध्वज लावण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, तसेच भव्य प्रमाणात राज्योत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी असे नमूद करण्यात आले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना आरटीआय कार्यकर्ते भीमाप्पा गडाद म्हणाले, राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी इमारतींवर कन्नड ध्वज लावण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, तसेच भव्य प्रमाणात राज्योत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात सरकारने त्वरित निर्णय जाहीर करावा. कर्नाटक राज्योत्सव दिनी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन पाळते. यावर सरकारने लक्ष पुरवून कारवाई करावी, अशी मागणी गडाद यांनी केली.
यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीसंदर्भात ते म्हणाले कि, सदर समितीवर सरकारने कारवाई करावी यासाठी अनेकवेळा कन्नड संघटनांनी निवेदने दिली आहेत. परंतु अद्याप सरकारने मतांसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. कोविड नियमानुसार सरकारने राज्योत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी गडाद यांनी केली.
यावेळी जिल्ह्यातील विविध कन्नड संघटनांचे सदस्य आणि समाजसेवक उपस्थित होते.


Recent Comments