
देशात १०० कोटी लोकांचे लसीकरण झाल्यानिमित्त बेळगावात जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

होय, कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताने वेगवान आघाडी घेत १०० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. बेळगाव जिल्ह्यातही ३०,६४,१२२ लशींचे डोस देण्यात आले आहेत. या विक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., हवेत फुगे उडवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, जिल्हा आरसीएच व लसीकरण अधिकारी डॉ. ईश्वर गडाद, जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम अमलबजावणी अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी आणि बेळगाव शहरातील आरोग्य केंद्रांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य शिक्षणाधिकारी शिवाजी, गट आरोग्य शिक्षणाधिकारी बसवराज यलीगार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.



Recent Comments