Belagavi

रणकुंडयेत मंदिराच्या जागेवरून दोन गटांत हाणामारी; चौघे जखमी

Share

 मंदिराच्या जागेच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत चौघेजण जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील रणकुंडये गावात बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस फौजफ़ाटा तैनात केला आहे.

होय, रणकुंडये गावात बुधवारी सायंकाळी मंदिराच्या आजगेच्या वादातून २ गटांत मारामारी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांनी गावात एका मंदिराचे पुनर्निर्माण सुरु केले आहे. त्याला गावातील इनामदार कुटुंबीयांनी हरकत घेतली. मंदिराच्या बाजूला प्रार्थनास्थळ आहे. त्यामुळे ही जागा आमचीच आहे असा दावा त्यांनी केला. त्यावेळी बेळगावातून आलेल्या काहीजणांनी बांधकामाला आक्षेप घेत विटा पाडल्याने प्रकरण हातघाईवर आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गटात मारामारी झाली. त्यात चौघेजण जखमी झाले.  पाशासाब मेहमुदपाशा इनामदार, वय ७४, सय्यद मेहमुदपाशा इनामदार, वय ३२, उमेद इकबाल अहमद सौदागर, वय ३३, तिघेही राहणार वीरभद्रनगर, बेळगाव तसेच अंजुम बाबाजान इनामदार, वय ४२, रा. आझाद गल्ली, बेळगाव अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच डीसीपी डॉ. विक्रम आमटे, एसीपी एन. व्ही. बरमणी, सदाशिव कट्टीमनी, सीपीआय सुनील नंदेश्वर यांनी रणकुंडयेला भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे रणकुंडये गावात तणावाचे वातावरण असून पोलीस फौजफ़ाटा तैनात केला आहे.

 

 

 

Tags: