Khanapur

रेशनचा तांदूळ नंदगड पोलिसांकडून जप्त

Share

काळ्या बाजारात विकण्यासाठी नेण्यात येणार रेशन कार्डावर द्यायचा तांदूळ नंदगड पोलिसांनी जप्त केला.

होय, अळणावर-खानापूर रस्त्यावर एका वाहनातून रेशनच्या तांदळाची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची पक्की खबर नंदगड पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचून वाहनासह तांदूळ जप्त केला. केए २५ सी २६२४ क्रमांकाच्या ४०७ मालवाहू वाहनातून रेशनचा हा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता. याप्रकरणी वाहनमालक शांतीनाथ पाटील याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

Tags: