थांबलेल्या ट्रकला भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. हा अपघात काकतीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर गुरुवारी सकाळी झाला.

: बेळगाव तालुक्यातील काकती गावाजवळील बर्डे धाब्याजवळ गुरुवारी भरधाव मोटरसायकलने रस्त्यात थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातात मोटारसायकलवरील दोन्ही युवक उडून पडले अन जागीच ठार झाले. अपघातात चव्हाट गल्ली, बेळगाव येथील रहिवासी श्रीनाथ डी. पवार आणि सदाशिव नगरात राहणारा रुचित आर. डुमावत अशी मृत युवकांची नावे आहेत.

ते दोघेही लिंगराज कॉलेजमध्ये बीकॉम पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत होते. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा आघात झाल्याने दोन्ही युवकांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काकती पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.


Recent Comments